नवी मुंबईत एकाच शाळेतील १८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

नवी मुंबईत एकाच शाळेतील १८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

नवी मुंबईतील घणसोलीयेथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातील १६ विद्यार्थी कोरोनाबाधीत आल्याने खळबळ उडाली आहे. घणसोलीत शेतकरी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातील १६ विद्यार्थी कोरोनाबाधीत असल्याचे समोर आले आहे. शाळेतील एका विद्यार्थ्यांचे नातेवाईक परदेशातून मायदेशी परतले होते. त्यामुळे त्या संबंधित विद्यार्थ्याची कोरोना चाचणी केली असता त्या विद्यार्थ्याच अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

शाळेतील एका विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या सहवासात आलेल्या इतर विद्यार्थ्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली. आणि या चाचणीमध्ये आणखी १५ विद्यार्थ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच शाळेतील १६ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे खळबळ उडाली असून प्रशासन चिंतेत सापडला आहे.

त्यामुळे आता नवी मुंबई मनपाच्या आरोघ्य विभागामार्फत सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. सर्व पोसिटीव्ह विद्यार्थ्यांना कोणतेही लक्षण नसून त्यांच्यावर सिडको एक्सिबिशन सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या ही शाळा सुरू असून वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर शाळा सुरू ठेवण्यावर काय निर्णय घ्यायचा याचा निर्णय महाविद्यालयाचे कार्यकारी मंडळ तसेच मनपाचे आरोग्य विभाग घेईल अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापकांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version