मलावी देशातील आंब्याला ग्राहकांची पसंती

मलावी देशातील आंब्याला ग्राहकांची पसंती

  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मलावी देशातील आंब्याची आवक वाढली आहे. पहिल्या दिवशी २३० बॉक्स विक्रीसाठी आले आहेत. घाऊक बाजारामध्ये १२०० ते १५०० रुपये प्रति किलो दराने हा आंबा विकला जात असून १५ डिसेंबरपर्यंत या आंब्याचा हंगाम सुरू राहणार आहे.

 पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातील आंबा हा मागील चार वर्षांपासून भारतात विक्रीसाठी येऊ लागला आहे. हापूससारखी चव, रंग आणि आकार असलेला हा आंबा दिवाळीच्या दरम्यान बाजारांत विक्रीसाठी येत असल्यामुळे ग्राहकांची या आंब्याला मोठी पसंती मिळत आहे.

 मलावी देशात कोकणाप्रमाणे वातावरण आहे. तेथील शेतकऱ्यांनी २०१०मध्ये हापूस आंब्याची रोपे घेऊन तेथे ७०० एकरमध्ये या आंब्याची लागवड केली होती. मागील ४ वर्षांपासून भारतात या आंब्याची आयात होत असून कोकणच्या हापूसची चव असल्यामुळे आंबे प्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरत आहे.

  हवाई वाहतुकीवरील खर्च वाढल्यामुळे या आंब्याचेही दर वाढले आहेत. त्यामुळे हा आंबा खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबईमध्ये १५ डिसेंबरपर्यंत या आंब्याच्या हंगाम सुरू राहणार असून पुढील महिन्यात या आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version