Congress on Parth Pawar : ‘कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने…’, कॉंग्रेसने पार्थ पवारांवरच साधला निशाणा

पार्थ पवार आणि काँग्रेस यांच्यात एकमेकांवर टीका करणं सुरू झालं आहे.
Congress on Parth Pawar : ‘कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने…’, कॉंग्रेसने पार्थ पवारांवरच साधला निशाणा

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. बारामतीची पोटनिवडणूक सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आकाश मोरे यांना विनंती केली. पण त्यांनी विनंती धुडकावून लावत काँग्रेसने आकाश मोरे मैदानात उतरले. काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीमध्ये अटीतटीची लढत होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. इतकंच नाही तर पार्थ पवार आणि काँग्रेस यांच्यात एकमेकांवर टीका करणं सुरू झालं आहे.

दिल्लीतील हायकमांडने उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने पार्थ पवार चांगलेच संतापले. यावेळी त्यांनी काँग्रेसने उमेदवार उभा केल्यावर पार्थ पवार यांनी थेट काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “एवढ्या जुन्या आणि मॅच्युअर पक्षाने असा निर्णय घेणं चुकीचं आहे. लोकांच्या मनात दादांबद्दल जे प्रेम आहे, ते काँग्रेस विसरली आहे. हा काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात आहे,” अशा शब्दांत पार्थ यांनी आपला संताप व्यक्त केला.

हेही वाचा – Anjali Damania : अजितदादांचा अपघात आणि ‘त्या’ दोन दिवसांत खरातला 36 मेसेज! दमानियांचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ 

त्यावरून आता काँग्रेसने अधिकृत ट्विटर हँडलवरून पार्थ पवारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की,धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ?

हेही वाचा – POD Taxi: मुंबईकरांमागील ट्रॅफिकची साडेसाती संपणार! देशातील पहिल्या ‘पॉड टॅक्सी’चा शुभारंभ,आता वांद्रे ते कुर्ला अंतर अवघ्या काही मिनिटांत 

स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने कॉंग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे ?”. आता यावर काय प्रतिक्रिया उमटणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version