Prashant Jagtap : ‘लाडकी बहीण ही फक्त निवडणुका जिंकण्यासाठी’; काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनी सांगितला योजनाचा उद्देश

काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनीही सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून सरकारला लक्ष्य केले आहे.
Prashant Jagtap : ‘लाडकी बहीण ही फक्त निवडणुका जिंकण्यासाठी’; काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनी सांगितला योजनाचा उद्देश

मुंबई : महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजप आणि महायुती सरकारवर विविध विषयांवरून विरोधक टीका करत आहेत. काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनीही सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून सरकारला लक्ष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस सरकारविरोधात 200 हून अधिक आंदोलन करणाऱ्या प्रशांत जगताप यांनी ही योजना फक्त निवडणुका जिंकण्यासाठीच सुरू केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही योजना कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर गायब करतील. लाडक्या बहिणींना ते सावत्र बहिण करतील. याचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीत ज्या प्रकारे खडखडात झाला आहे. त्यानुसार त्यांना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, असे जगताप म्हणाले. तसेच भाजप सरकारने लाडकी बहीण योजना मागे घेऊ नये, असंही त्यांनी नमूद केलं आहे. असे केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले. त्या लाडक्या बहिणींची फसवणूक भाजपनं केली तर त्याच लाडक्या बहिणींना घेऊन आम्ही या मंत्र्यांच्या गाड्या अडवू, असे त्यांनी म्हटले आहे.  

हेही वाचा : Uddhav-Raj Thackeray Interview: “…त्यावेळेस मोदींना वाचवणारे बाळासाहेब ठाकरे होते” मराठी-हिंदू विषयावरून उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version