पुणे : भोर मतदारसंघाचे माजी आमदार तथा काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आहे. त्यांनी अनेक वर्षे भोर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्त्व केले होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकाणाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
अनंतराव थोपटे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक वर्षे भोर या मतदारसंघाचे नेतृत्त्व होते. त्यांनी एकूण 14 वर्षं मंत्रिपद भूषवलेलं होते. ते एकूण 6 वेळा भोर मतदारसंघाचे आमदार राहिले. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. काँग्रेस पक्षातही त्यांच्या शब्दाला मोठा मान होता. अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव संग्राम थोपटे सध्या राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. संग्राम थोपटे यांचा 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते शंकर मांडेकर यांनी पराभूत केले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.