महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सोशल मीडिया पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या एका पोस्टमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा सोशल मीडियावर” गुंगी गुडिया “ म्हणून उल्लेख केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात घुसून राष्ट्रवादी युवा नेत्यांनी जोरदार आंदोलन पुकारले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करत मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कार्यकर्ते काँगेस भवनमध्ये घुसून आंदोलन करत आहेत. सुनेत्रा पवारांवर केलेल्या या टीकेचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समर्थन केलं असून, सुनेत्रा पवार यांनी आपण गुंगी गुडिया नाही आहोत हे सिद्ध करून दाखवावं, असा सल्ला दिला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "पत्रकारांनी प्रश्न विचारले पाहीजे. आणि त्यांना उत्तरे दिले पाहीजे. पत्रकार प्रश्न विचारत आहे. एक लोकप्रतिनिधीपेक्षा गुंड अशी प्रतिमा असलेला वक्ती पत्रकारांना थांबवतोय. त्यावर उपमुख्यमंत्री मात्र काही बोलत नाही. अशावेळी गप्प बसल्यामुळे हा शब्द प्रयोग केला गेला आहे. काही असंसदीय शब्द आहे का? त्यामुळे त्या अनेक मुद्यावर बोलत नाही दादांच्या अपघाती मृत्यूवर बोलत नाही. त्या त्यांच्या अर्थखात्याबाबात काही बोलत नाही त्यांच्या लोकांवर भाजप अन्याय करत आहेत त्यावर त्या गप्प आहेत.."
पुढे ते म्हणाले की, "या आमच्या टीकेला त्यांनी समजून घ्यावे. यावर कुणी आम्हाला शहाणपण शिकवू नये. इंदीरा गांधी यांना ही या शब्दाने बोलले गेले पण त्यांनी कृतीतून दाखवून दिले.. त्यांनी दुर्गा आहे हे सिद्ध करावे.. त्यांनी ताबाडतोब अर्थ खाते स्वत:कडे घ्यावे. त्यांनी दादांचा तपास पूर्ण करावा. त्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे वाढवून द्यावे.. भाजपने जे त्यांचे हाल सुरू केले आहे. अजित पवार यांचा पक्ष अमित शहा यांच्या ताटा खालचे मांजर झाले आहे. आता थेट निवडणूक आयोग सांगतोय की जे सगळे पद तुम्ही आणि तुमच्या मुलांनी जी स्वत:कडे घेतलं. त्याबाबत त्यांनी आमच्या कार्यालयापुढे आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी निर्णय घ्यावे. आम्ही वस्तुस्थिती सांगितली आम्ही केलेली टीका लोकांनी स्वीकारली असती."
यानंतर काँग्रेसने गुंगी गुडिया असे संबोधन दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. सुनेत्रा पवारांबद्दल अशी भाषा खपवून घेणार नाही, काँग्रेसला आता योग्य भाषेत उत्तर देणार असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास पासलकर यांनी दिला. हर्षवर्धन सपकाळ यांनी पुरुषी मानसिकतेतून हा उल्लेख केल्याचं देखील पासलकर यांनी म्हटलं असं देखील त्यांनी म्हटलं आहे. योग्य भाषेत उत्तर देण्यात येईल अस देखील त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.