पुण्यात फलकावरून वाद, आमदार सिद्धार्थ शिरोळेंविरोधात तक्रार

पुण्यातील भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिस तक्रार करण्यात आली आहे.
पुण्यात फलकावरून वाद, आमदार सिद्धार्थ शिरोळेंविरोधात तक्रार

पुणे : पुण्यातील भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिस तक्रार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या फलकावर सहमतीशिवाय फोटो लावल्याच्या आरोपात शिरोळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या फलकावर संमतीशिवाय फोटो लावल्याचा आरोप संबंधीत महिलांनी केला आहे. या संदर्भात सोमवारी सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याकडे संबंधीत महिलांनी तक्रार केली आहे. पुण्यात लाडकी बहीण योजनेचे फलक भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळोे यांच्याकडून लावण्यात आले आहे. 

सिद्धार्थ शिरोळे हे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. शिरोळे भाजपाचे आमदार आहेत.  
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version