कॉफी म्हणजे फक्त झोप कमी करणारे पेय, असा अनेकांचा समज असतो. मात्र योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने कॉफीचे सेवन केले, तर ती आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, कॅफीन आणि इतर पोषक घटक असतात, जे शरीराला ऊर्जा देण्यासोबतच काही गंभीर आजारांचा धोका कमी करण्यात मदत करू शकतात.
कॉफीचा सर्वात मोठा फायदा हृदयाच्या आरोग्यावर होतो. योग्य प्रमाणात कॉफी पिण्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. तसेच पार्किन्सन आजाराला आणि अल्झायमर यांसारख्या आजारांचा धोका कमी करण्यासाठीही कॉफी उपयुक्त मानली जाते. याशिवाय कॉफी मूड सुधारण्यास मदत करते आणि थकवा दूर करून उत्साह वाढवते.
कॉफीचे सेवन यकृतासाठीही फायदेशीर मानले जाते. यामुळे लिव्हर अधिक मजबूत राहण्यास मदत होऊ शकते. काही संशोधनांनुसार, कॉफी पिण्याने कोलन कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते. तसेच टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका कमी करण्यासाठीही कॉफी उपयुक्त ठरू शकते.
वजन कमी करण्यासाठीही कॉफी मदत करू शकते. कॉफीमधील कॅफीन शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते, ज्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. मात्र यासाठी साखर आणि जास्त क्रीम टाळून साधी कॉफी पिणे अधिक फायदेशीर ठरते.
मानसिक आरोग्यासाठीही कॉफी उपयुक्त आहे. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, कॉफी मेंदूची कार्यक्षमता सुधारू शकते. एकाग्रता वाढवणे, स्मरणशक्ती सुधारणा आणि ऊर्जा वाढवणे यासाठी कॉफी फायदेशीर मानली जाते. तसेच नैराश्याची लक्षणे कमी करण्यासाठीही कॉफी उपयुक्त ठरू शकते.
मात्र कोणतीही गोष्ट मर्यादित प्रमाणातच फायदेशीर असते, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. दिवसातून एक ते दोन कप कॉफी पुरेशी मानली जाते. जास्त प्रमाणात कॉफी घेतल्यास झोप न लागणे, हृदयाचे ठोके वाढणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
(Health Disclaimer : येथील आरोग्यविषयक माहिती ही केवळ सामान्य माहिती आणि जागरूकतेसाठी दिलेली आहे. या माहितीतून होणाऱ्या कोणत्याही परिणामासाठी जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल जबाबदार राहणार नाही.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.