पुण्यात सीएनजी दोन रुपयांनी महागला

पुण्यात सीएनजी दोन रुपयांनी महागला

सीएनजी वाहन चालकांना पुन्हा डोकेदुखी होणार आहे. सीएनजी दरात सलग तिसऱ्यांना दरवाढ झाली असून पुण्यात सीएनजी दोन रुपयांनी महागला आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सीएनजीच्या दरामध्ये दोन रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) ने घेतला आहे. त्यामुळे पुण्यात आता वाहन चालकांना बुधवारी मध्यरात्री बारानंतर एक किलो सीएनजीसाठी ८२ रूपये मोजावे लागणार आहेत. गेल्या काही महिन्यात सीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. सीएनजी गॅसची मागणी सतत वाढत आहे. पण, स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग झाल्यामुळे सीएनजीच्या दरात सतत वाढ होत आहे. पुण्यात एक एप्रिल २०२२ रोजी सीएनजीचा दर ६२.२० रुपये होता. त्यामध्ये सतत वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात तीन वेळा सीएनजीमध्ये वाढ करण्यात आली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version