तामिळ नाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थलापती विजय हे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या हटके अंदाजाने अनेकदा ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. तसेच त्यांचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मिडियावर व्हायरल होतात. ते जनतेच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबवत आहेत. आता त्यांनी तामिळनाडूच्या जनतेला एक नवीन भेट दिली आहे.
मुख्यमंत्री थलापती विजय यांनी चेन्नईमध्ये 300 नवीन डिझेल आणि सीएनजी (CNG) राज्य परिवहन बसेसना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. सचिवालयातून या बसेसचे उद्घाटन केल्यानंतर, त्यांनी स्वतः एका बसमधून प्रवास करून त्यातील सुविधांची पाहणी केली. प्रवासादरम्यान त्यांनी लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले आणि बस वाहकाशी संवादही साधला.
4 मे 2026 रोजी, ‘थलपती’ विजय यांच्या पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला. निवडणुकीत त्यांच्या पक्षाला सर्वाधिक मते मिळाली, परंतु बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागली. त्यानंतर, 1997 मध्ये त्यांच्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाने तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन केले; आता विजय आपल्या राज्यातील जनतेसाठी ‘नायक’ बनले आहेत आणि त्यांची सक्रियपणे सेवा करताना दिसत आहेत.
CM Thalapathy Vijay is having the absolute most fun being the Chief Minister. No pressure at all. ❤pic.twitter.com/VHU2WZlPNs — George ?? (@georgeviews) June 25, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.