Devendra Fadanvis: ‘जनतेच्या पैशांची उधळपट्टी नको, विकासकामांवर भर द्या’ ; मुख्यमंत्र्यांचा पदाधिकाऱ्यांच्या इनोव्हा प्रस्तावाला ब्रेक

जनतेचा पैसा हा विकासकामांसाठीच खर्च झाला पाहिजे, अनावश्यक खर्च टाळून नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
Devendra Fadanvis: ‘जनतेच्या पैशांची उधळपट्टी नको, विकासकामांवर भर द्या’ ; मुख्यमंत्र्यांचा पदाधिकाऱ्यांच्या इनोव्हा प्रस्तावाला  ब्रेक

मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसाठी इन्नोव्हा गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावावरून निर्माण झालेला वाद अखेर राज्य सरकारपर्यंत पोहोचला आहे. प्रस्तावावर चौफेर टीका होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. जनतेचा पैसा हा विकासकामांसाठीच खर्च झाला पाहिजे, अनावश्यक खर्च टाळून नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

महापालिकेच्या सभागृह नेते गणेश खणकर यांच्या नावाने इन्नोव्हा गाड्या घेण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने विरोधकांनी जोरदार टीका केली होती. जनतेच्या कराच्या पैशातून नव्या आलिशान गाड्या घेण्याची गरज काय, असा सवाल करत विरोधी पक्षांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता.

मात्र, वाद वाढल्यानंतर गणेश खणकर यांनी स्वतःच स्पष्टीकरण देत आपण नव्या गाड्यांची कोणतीही मागणी केली नसल्याचे सांगितले. सध्या वापरात असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाड्याच कायम ठेवाव्यात आणि सर्व पदाधिकाऱ्यांना समान प्रकारची वाहने उपलब्ध करून द्यावीत, अशी भूमिका त्यांनी पत्राद्वारे मांडली.

या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली. विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या गरजांवर निधी खर्च करणे हेच प्राधान्य असावे, अनावश्यक खर्चाला प्रोत्साहन देता कामा नये, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्याचे समोर आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version