CM Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोशल मिडियावर ट्रेंडिंगला, ‘InframanDevabhau’हॅशटॅग वापरून होतंय कौतुक

मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील 'अंतर' आणि 'वेळ' दोन्ही कमी करणारा गेमचेंजर 'मिसिंग लिंक' प्रकल्प आजपासून वाहतुकीसाठी अधिकृतपणे खुला झाला असून, याच्या लोकार्पणासोबतच महाराष्ट्राच्या शिरपेचात जा
CM Devendra Fadanvis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोशल मिडियावर ट्रेंडिंगला, ‘InframanDevabhau’हॅशटॅग वापरून होतंय कौतुक

सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या आणि खंडाळा घाटातील वळणांवर रेंगाळणाऱ्या मुंबई-पुणे प्रवासाला आता खऱ्या अर्थाने ‘गती’ मिळाली आहे. घाटमाथ्यावरील निसर्गरम्य सौंदर्यात भर घालत, अत्याधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्भुत आविष्कार आज महाराष्ट्र दिनाच्या सुवर्णक्षणी राज्याच्या सेवेत रुजू झाला आहे. मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमधील ‘अंतर’ आणि ‘वेळ’ दोन्ही कमी करणारा गेमचेंजर ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आजपासून वाहतुकीसाठी अधिकृतपणे खुला झाला असून, याच्या लोकार्पणासोबतच महाराष्ट्राच्या शिरपेचात जागतिक विक्रमाचा मानाचा तुरा खोवला गेला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज, 1 मे 2026 रोजी या बहुचर्चित प्रकल्पाचे दिमाखदार लोकार्पण करण्यात आले. उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्टेअरिंग हाती घेत (ड्राइव्ह करत) या नव्याकोऱ्या बोगद्यातून प्रवासाचा आनंद लुटला. 

फडणवीस यांच्या कार्यकाळात महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. यामध्ये मिसिंग लिंक, भुयारी मेट्रो, आरे कार शेड, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू अशा अनेक वास्तू उभारल्या आहेत. फडणवीस यांच्या या सर्व कामांची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.  समाज माध्यमात ‘इन्फ्रामॅन देवाभाऊ’ हॅशटॅगही ट्रेंड होत आहे. त्याचप्रमाणे आज ‘इन्फ्रामॅन देवाभाऊ’ हॅशटॅग भारतात अव्वलस्थानी आहे. या गोष्टीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version