मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाममधील धीरेंद्र शास्त्री यांना नागपूर पोलिसांकडून क्लिनचीट देण्यात आली आहे. नागपुरात पार पडलेल्या धीरेंद्र शास्त्रींच्या दिव्य दरबारावरविरोधात अंनिसकडून नागपूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली गेली होती.
‘धीरेंद्र शास्त्रींनी नागपुरातील दिव्य दरबारात केलेल्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ अन्वये गुन्हा दाखल होऊ शकत नाही’, अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ‘यासंदर्भात, ड्रग्ज् अँड रेमेडीज् कायद्यांतर्गत सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकत नाही’, असेही पोलीस आयुक्त म्हणाले.
नागपूरच्या रेशीम बाग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राम कथा या कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्रींनी भाषण केले होते. या संपूर्ण भाषणाचे व्हिडिओज् पोलिसांनी तपासले असून ‘या भाषणात कुठल्याही पद्धतीची आक्षेपार्ह गोष्ट आढळली नाही’, असे पोलीस आयुक्त म्हणाले आहेत. त्यामुळे, नागपूर पोलिसांकडून धीरेंद्र शास्त्रींना क्लिनचीट मिळाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.