दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नवा व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेने शाळा सुरू करण्याबाबत पालिकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला. पुण्यातील पहिली ते आठवीचे वर्ग बंदच राहणार असल्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.
कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनमुळे राज्यातील शाळा सुरू होण्याचा निर्णय लाबंवण्यात आला आहे. सद्य परिस्थिती पुण्यातील पहिली ते आठवीचे वर्ग बंदच राहणार असून १५ डिसेंबरनंतर परिस्थिती पाहून शाळा सुरू होण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.
राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला. त्यामुळे उद्यापासून शाळांचे विद्यार्थ्यांसाठी खुले होणार होते. मात्र पुन्हा एकदा देशावर कोरोनाच्या नव्या विषाणूचे संकट ओढावल्यामुळे पुण्यातील पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग बंदच राहणार आहेत. तसेच अद्याप लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. दरम्यान आमिओक्रॉनच्या नव्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करणे योग्य नाही. त्यामुळे पुणे महानगर पालिकेच्या हद्दीतील शाळा १५ डिसेंबरनंतर परिस्थिती पाहून सुरू करणार असल्याचे पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.