रंगपंचमी दिवशी गप्पा मारत बसल्यानंतर अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दहावीत शिकणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास इंदापुरातील सरडेवाडीत ही दुर्देवी घटना घडली आहे. तिला उपचारासाठी इंदापूर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र तपासणी अंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सृष्टी सुरेश एकाड असं मयत विद्यार्थ्यांनीचं नाव आहे या दुर्देवी घटनेमुळे इंदापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
सृष्टी ही आपल्या कुटुंबासोबत इंदापूर तालुक्यातील सरसेवाडी येथे राहत होती. ती नारायणदास रामदास हाय स्कूल मध्ये दहावी या वर्गात शिकत होती. अत्यंत मनमिळावू स्वभाव, अतिशय हुशार आणि विविध शालेय स्पर्धांमध्ये तिचा सहभाग असायचा. सध्या सहावीच्या परीक्षा सुरु आहेत. सोमवारी १३ मार्च रोजी शेवटचा पेपर देण्यापूर्वीच तिचे दुःखात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.