Shiv Sena UBT Clash: पुण्यात ठाकरे गटाच्या बैठकीनंतर शिवसैनिकांमध्येच राडा; आदित्य ठाकरे निघून जाताच जोरदार धक्काबुक्की

आदित्य ठाकरे यांची बैठक संपवून ते रवाना होताच, उपस्थित स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद पेटला. नेत्याला भेटू न दिल्याचा आरोप करत नाराज कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
Shiv Sena UBT Clash: पुण्यात ठाकरे गटाच्या बैठकीनंतर शिवसैनिकांमध्येच राडा; आदित्य ठाकरे निघून जाताच जोरदार धक्काबुक्की

Shiv Sena UBT Clash: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आदित्य ठाकरे यांची बैठक संपवून ते रवाना होताच, उपस्थित स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद पेटला. नेत्याला भेटू न दिल्याचा आरोप करत नाराज कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, ज्याचे पर्यावसान थेट एकमेकांना धक्काबुक्की करण्यात झाले. या अंतर्गत वादाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

शहर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली संघटनात्मक बैठक
आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुण्यातील प्रमुख पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पक्षाची पुढील रणनीती, आगामी निवडणुकांचे नियोजन आणि संघटनात्मक मजबुतीकरण यांसारख्या विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. खासदारांच्या संभाव्य बंडखोरीच्या सुरू असलेल्या अफवा आदित्य ठाकरेंनी याच दौऱ्यात फेटाळून लावल्या. मात्र, ही बैठक संपवून ते मुंबईकडे रवाना होताच पुढचा ड्रामा सुरू झाला.

हेही वाचा – Aditya Thackeray: ठाकरे गटात पुन्हा बंडखोरीची ठिणगी? खासदार फुटणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरेंचे मोठे विधान

आदित्य ठाकरे यांना भेटण्याची इच्छा असलेल्या काही स्थानिक कार्यकर्त्यांना नियोजनातील त्रुटींमुळे भेट घेता आली नाही. यावरून तिथे उपस्थित असलेल्या व्यवस्थापक आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की कार्यकर्त्यांनी एकमेकांना थेट धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तात्काळ मध्यस्थी केली. त्यांनी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढून वाद शांत केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version