कॉकरोच जनता पार्टीच्या एका आंदोलनाने संपूर्ण देशात खळबळ माजली. यादरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवस कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या अध्यक्षेखाली सीजेपीची बैठक पार पडली. यावेळी देशातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी येत्या सप्टेंबर महिन्यात सीजेपीकडून ‘क्या बोलती पब्लिक’ ही विशेष आणि महत्त्वाची मोहिम राबवण्यात येणार आहे.
ही घोषणा ‘सीजेपी’चे अभिजीत दीपके यांनी केली असून या मोहिमेत त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्याचसोबत कॉकरोच जनता पार्टी यानंतर पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करणार असल्याचे देखील कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सांगितले. यावेळी शिक्षण व्यवस्था, न्याय व्यवस्था, मीडिया, बेरोजगारी आणि सपोर्ट करणाऱ्या सर्व जनतेला सोबत घेऊन जाऊन कॉक्रोच जनता पार्टी वाढवायची तसेच राजकारणाशी न जोडता समाजकारण करायचे असे मोठे विधान केले आहे. तसेच थेट सरकारवर निशाणा साधला आहे.
अभिजीत दिपकेंनी सांगितले पाच महत्त्वाचे मुद्दे
यावेळी अभिजीत दिपके यांनी म्हटलं की, “पाच महत्त्वाचे मुद्दे घेऊन आम्ही समोर वाटचाल करणार आहोत. पहिली शिक्षण व्यवस्था आहे ज्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सर्वात पहिले शिक्षण व्यवस्थेवर लढणार आहोत. दुसरी न्यायव्यवस्था व्यवस्था खूप महत्त्वाचे आहे. तिसरा मुद्दा म्हणजे मीडिया, मीडिया मागच्या काही दिवसांमध्ये कुठल्या एका बाजूने बोलत आहे त्यामुळे लोकांचा विश्वास उडाला आहे. त्याला स्वतंत्र बनवणे गरजेचे आहे. चौथी व्यवस्था म्हणजे बेरोजगारी आहे. जंतर-मंतरवर फक्त विद्यार्थी नव्हते तर बेरोजगार लोक देखील होते. 35 वर्षाच्या आत असणारे जास्त बेरोजगार आहेत. 60% लोकांना नोकरी नाही ज्यांना आहे त्यांना पगार एवढ्या कमी आहेत की घर चालवणे अवघड आहे. काही बेरोजगाराची आहे ज्यांच्याकडे डिग्री असून ते बेरोजगार आहे. कॉकरोच जनता पार्टीला समोर घेऊन जाण्याचा अजेंडा आहे. काशीची काशी झाली तसे आम्ही करणार नाही. कुठलाही एक व्यक्ती अडचणी दूर करू शकत नाही. ज्या ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला, त्या सर्वांसोबत आम्ही एकत्र येऊन देशासाठी राजकारणाच्या वरती जाऊन नागरिक म्हणून एकत्र येऊन सुधारण्याचा आहे.”
“कधी शाळेत न गेलेले लोक सरकार चालवत आहेत”
“आपल्या देशातील परिस्थिती, शिक्षेचे स्थर याबाबत आम्ही लोकांशी बोलणार… आज भारतात शिक्षण घेणे म्हणजे डोक्यावर कर्ज घेणे अशी परिस्थिती आहे. गेल्या काही वर्षात देशात शिक्षण म्हणजे व्यवसाय झाला आहे. संस्थेबद्दलचा राग जंतर मंतर दिसून आला. एकाला वोट टाकला जातो मात्र तो दुसऱ्याच पक्षात दिसतो त्यामुळे लोकांचा विश्वास तुटत चालला आहे. न्यायालयावर देखील अनेक प्रश्न आहे. तारीख पे तारीख म्हणले जाते. गरिबाला तारीख मिळत नाही. मात्र मोठ्या लगेच मिळते. सामन्याला न्याय पाहिजे तेंव्हा कोर्टाकडे वेळ नसतो. लोकांचा सगळ्यात जास्त राग मिडिया वर आहे. मिडिया फक्त सत्ताधारी यांचेच आवज ऐकते. जोपर्यंत माध्यमे स्वातंत्र्य वागणार नाही तो पर्यंत अकाउंटेबल बनविणे शक्य नाही”.
“आपल्या देशात 60 टक्के 35 वर्षाखालील आहेत. आपल्या देशात नोकरीच्या संधी नाहीत. जण नोकरी मिळते त्यांना घर चालवणे शक्य नाही. मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. त्यातील बहुतांश लोकांकडे पदवी आहे. त्यांना आज वाटते पदवी घेऊन आम्ही चुकी केली आहे. युवक, शिक्षण आणि बेरोजगारीचा मुद्दा तुम्ही नजरंदाज करू शकत नाही… एखादा व्यक्ती सर्व समस्या संपवेल असे म्हणत असेल तर तो चुकीचा बोलत आहे. 2014 सारखी चुकी करू नका, म्हटले गेले होते कशीचे टोकियो करू मात्र काशाची काशी केलीय. क्या बोलती पब्लिक हे कॅम्पेन आम्ही सप्टेंबर पासून देशभरामध्ये राबवणार आहोत. या कॉम्पेनसाठी आम्ही देशभर फिरणार आहोत.”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.