भाजप नेते किरीट सोमैया खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्यास भेटण्यास गेले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे मुंबईत झालेल्या हल्ल्यामुळे सोमैयांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. तसेच या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाला लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, सोमैयांच्या हल्ल्याची सीआयएसएफने गंभीर दखल घेतली आहे.
किरीट सोमैया यांच्यावर पुन्हा हल्ला झाला तर कठोर कारवाईचे आदेश दिले जातील, अशा इशारा सीआयएसएफने दिला आहे. याप्रकरणी सीआयएसएफची पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली. सोमैया यांच्यावर दोन वेळा झालेल्या हल्ल्यानंतर सीआयएसएफच्या वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सोमैयांवर पुन्हा हल्ला झाला तर कठोर कारवाईचे आदेश दिले जातील, अशी माहिती सीआयएसएफने दिली असल्याची समोर आली आहे.
किरीट सोमैया यांच्या गाडीवर झालेल्य हल्ल्याप्रकरणी सोमैयांसह भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी याप्रकरणी तपासासाठी विशेष संघ पाठवण्याची विनंती गृहसचिवांना केली आहे. त्यानुसार आता सीआयएसएफने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून सोमैयांवर हल्ला झाल्यास शुट ऍट साईटचे आदेश देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.