छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून सात कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आचारसंहितेच्या काळात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. चालकांकडून दंडाच्या स्वरुपात ही रक्कम वसूल करण्यात आली. पोलिसांनी ही माहिती दिली. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी होईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.