संपूर्ण महाराष्ट्रात काल २९ महापालिकांसाठीचं मतदान पार पडलं. आज या निवडणुकांचा निकाल हाती येणार आहे. १० वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे आता उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशातच आता छत्रपती संभाजी नगरमध्ये असणाऱ्या शासकीय इंजीनियरिंग कॉलेजमध्ये उमेदवाराच्या प्रतिनिधीला आतमध्ये येण्यावरून पोलिसांमध्ये वाद झाला यावरून पोलिसांनी उमेदवारांच्या प्रतिनिधीला लाठीचार्ज केला , मतदान केंद्रावरती मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.