Chhatrapati Sambhajinagar Crime: संतापजनक! बापाकडूनच पाच वर्षीय चिमुकल्याचा लैंगिक छळ; वर्षभरापासून सुरू असलेला प्रकार असा झाला उघड

दरम्यान 5 वर्षीय मुलाचा वाढदिवस होता. मात्र या दिवशी मुलगा अत्यंत अबोल आणि घाबरलेला दिसत होता.
Chhatrapati Sambhajinagar Crime: संतापजनक! बापाकडूनच पाच वर्षीय चिमुकल्याचा लैंगिक छळ; वर्षभरापासून सुरू असलेला प्रकार असा झाला उघड

पाच वर्षांच्या चिमुकल्याचा बापानेच लैंगिक छळ केल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार संभाजीनगर मधील सातारा परिसरात उघडकीस आला. या नराधम बापाने मुलाला याबाबत आईला सांगितल्यास गच्चीवरून फेकून देण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात 32 वर्षीय नराधम आरोपी बापाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान 5 वर्षीय मुलाचा वाढदिवस होता. मात्र या दिवशी मुलगा अत्यंत अबोल आणि घाबरलेला दिसत होता.

 आईने त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने बापाच्या क्रूरतेचा धक्कादायक पाढा वाचला. आरोपी बाप वारंवार अंगाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचे तसेच अनैतिक कृत्य करत असल्याचे चिमुकल्याने आपल्या आईला सांगितले. हा प्रकार जानेवारी फिर्यादी महिलेलाही अनेकदा 2025 ते फेब्रुवारी 2026 या काळात घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version