आखाती युद्धाचा परिणाम आता जगातील सर्व देशांवर दिसू लागला आहे. युद्धाची झळ आता थेट भारतीयांच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली आहे. महाष्ट्रात आता ही झळ येऊन पोहोचली आहे. यावरून आता मंत्री छगन भुजबळ यांनी इंधन साठ्याबद्दल माहिती दिली आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "युद्ध सुरू आहे. त्याचा परिणाम गॅस पेट्रोल डिझेल आणि अनेक गोष्टींच्या बाबतीत होताना बघायला मिळत आहे. केवळ मुंबई महाराष्ट्रत हा परिणाम नाही पण संपूर्ण देशात याचा परिणाम होत आहे. जपान सरकारमध्ये देखील याचा परिणाम होत आहे. तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथून शक्य होईल तिथून इंधन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. होर्मुज खाडी येथून काही जहाजे सोडण्याचा प्रयत्न करत आहे.. मात्र आठवडवा पिक जास्त होत आहे. सिलेंडर बंद होणार वैगरे काल मुख्यमंत्री यांनी साथ पुरेसा असल्याचे सांगितले.. सातत्यांनी गोष्टी मिळत आहे.
अनेकांनी पीएनजी (पाईप नॅचरल गॅस) घेतले नाही. जिथे पीएनजी मिळविण्याची सोय आहे तिथेही अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ३ महिन्याच्या आत सगळ्यांनी पीएनजी सुरू करायचा आहे. ज्यांना पीएनजी हवा आहे, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. संबंधित कंपन्यांना शहरातील भाग वाटून दिले आहेत. मुंबई- ठाणे-नवी मुंबई इथे महानगर गॅस आहे.
अशा प्रकारे विविध कंपन्यांना भाग दिले आहेत. लोकांना अर्ज कुठे द्यावे हे कळत नाही. त्यांनी तो आमच्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे द्यावा. मला पीएनजी हवा आहे, असे अर्जात नमूद करून पत्त्यासह पुरवठा विभागाकडे अर्ज द्या. अधिकाऱ्यांनी ते अर्ज त्वरेने गॅस एजन्सीकडे जमा करावेत, असे निर्देश भुजबळ यांनी दिले. तसेच शक्य असूनही पीएनजी गॅस घेतला नाही तर LPG बंद होऊ शकतो, असा इशाराही भुजबळ यांनी दिला. जर तुम्ही अर्ज केला असेल आणि काही कारणांनी तुमच्याकडे पीएनजी कनेक्शन आले नाही तर समजू शकतो. पण तुम्ही अर्जही केला नसेल तर मात्र तुमचा एलपीजी बंद होऊ शकतो, असे भुजबळ म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.