Chhagan Bhujbal on Gas Shortage : आता चिंता नको! गॅस सिलेंडर पुरवठ्याबाबत छगन भुजबळांची मोठी घोषणा, आता पेट्रोल पंपावर मिळणार…

राज्यातील घरगुती गॅसचे दैनंदिन उत्पादन 9000 वरुन 11000 मेट्रिक टनपर्यंत वाढवल्याचे सांगितले.
Chhagan Bhujbal on Gas Shortage : आता चिंता नको! गॅस सिलेंडर पुरवठ्याबाबत छगन भुजबळांची मोठी घोषणा, आता पेट्रोल पंपावर मिळणार…

आखाती युद्धाचा परिणाम सध्या भारतातही दिसू लागला आहे. सध्या युद्धामुळे गॅस टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे गॅस मिळवण्यासाठी केंद्राबाहेर लांबच लांब रांगा दिसून येत आहेत.या पार्श्वभूमीवर बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधीमंडळात महत्त्वाची माहिती दिली आहे. छगन भुजबळ यांनी राज्यातील गॅस टंचाईबाबत भाष्य करताना म्हटले की, मी बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सकाळी चर्चा केली. त्यांनी राज्यातील घरगुती गॅसचे दैनंदिन उत्पादन 9000 वरुन 11000 मेट्रिक टनपर्यंत वाढवल्याचे सांगितले. 

त्याचप्रमाणे ते म्हणाले की,  आपल्याकडे राज्यात केरोसिनचा भरपूर साठा आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केरोसिन द्यायची गरज नाही, असे निर्देश मध्यंतरी न्यायालयाने दिले होते. मात्र, आता आम्ही सगळ्यांना केरोसिन उपलब्ध करण्यासंदर्भात न्यायालयाला कळवले आहे. त्यानुसार केरोसिन डिलर्सही केरोसिन देऊ शकतात. 

हेही वाचा – Ritu Tawde : मोठी बातमी! मुंबई महापौर रितू तावडे यांच्या सुरक्षेत वाढ; नक्की कोणापासून धोका?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version