सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याने काही दिवसांपासून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पुतळ्या कोसळला कसा याप्रकरणी राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यासंदर्भात चेतन पाटील याला शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले होते आणि शनिवारी त्याला अटक करण्यात आली. चेतन हा राजकोट किल्ल्याचा स्थापत्य सल्लागार आहे. त्याच्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. चेतन पाटील याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अधिक माहिती लवकरच मिळेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.