‘चांद्रयानाचा प्रवास नेहरूंपासून मोदींच्या सहकार्यामुळे शक्य’

‘चांद्रयानाचा प्रवास नेहरूंपासून मोदींच्या सहकार्यामुळे शक्य’

‘चांद्रयानाचा प्रवास नेहरूंपासून मोदींच्या सहकार्यामुळे शक्य’

कोल्हापूर, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : शरद पवार यांची कोल्हापुरात शुक्रवारी सभा पार पडली यावेळी बोलताना शरद पवारांनी मोदींच कौतुक केल आहे. भारताच्या चांद्रयानाचा प्रवास नेहरूंपासून मोदींच्या सहकार्यामुळे शक्य झाले. कांद्याच्या प्रश्नावरही शरद पवार बोलले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाची किंमत मिळालीच पाहिजे. कांदा उत्पादनासाठी जो खर्च येतो त्याची रक्कम त्यांना मिळालीच पाहिजे. आणि ही मागणी पूर्ण करायची असेल तर कांदा महाराष्ट्रातच नाही तर बाहेर देशातही कांदा पोहचवला गेला पाहिजे. असं शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील कांदा बाहेर देशात जात असताना मोदी सरकारने त्यावर ४० टक्के कर लावला, आणि त्यामुळे कांद्याची मागणी बाहेर देशात कमी झाली. अशी टीकाही त्यांनी मोदी सरकारवर केली आहे. सत्ताधारी पक्ष सत्तेचा वापर विरोधी पक्षाच्या लोकांना त्रास देण्यासाठी करतात. असा टोला शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version