BJP vs Congress In Maharashtra : ‘महानगरपालिकेत त्यांना भोपळा मिळणार’; भाजप – काँग्रेसमध्ये जुंपली, आरोप – प्रत्योरापांच्या फैरी सुरूच

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी, विरोध यांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहे.
BJP vs Congress In Maharashtra : ‘महानगरपालिकेत त्यांना भोपळा मिळणार’; भाजप – काँग्रेसमध्ये जुंपली, आरोप – प्रत्योरापांच्या फैरी सुरूच

नागपूर : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी, विरोध यांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहे. एकाच्या आरोपला दुसऱ्याचं उत्तर, दुसऱ्याच्या वक्तव्यावर तिसऱ्याची पाठराखण, असे प्रकार निवडणुकीच्या रणधुमाळीत पाहालया मिळत आहेत. यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला असून देताना राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा पद्धतीने खालच्या पद्धतीची टीका सहन करणार नाही, असे म्हटले आहे. 

हेही वाचा : Ajit Pawar : 'काकांच्या पुण्याईनेच माझं लय बरं चाललंय..'; पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांची गुगली

काय म्हणाले बावनकुळे 

हर्षवर्धन सपकाळ यांनी जी टीका केली आहे. त्यावर मी एवढेच म्हणेन की, हर्षवर्धन सपकाळला नागपूरच्या मनोरुग्णालयात तातडीने दाखल करण्याची गरज आहे. नगरपालिका निवडणुकीत जो पराभव झाला आणि काँग्रेस अत्यंत कमी झाली, आता हर्षवर्धन सपकाळचे पद जाणार असा काहीतरी संकेत त्यांना दिला गेला असेल, म्हणून आपलं अध्यक्षपद टिकवण्याकरता फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीची टीका करून राहुल गांधी यांच्या समोर मेरिट दाखवण्याचा प्रयत्न करतात. महानगरपालिकेत त्यांना भोपळा मिळणार आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशा पद्धतीने खालच्या पद्धतीचे टीका सहन करणार नाही, हर्षवर्धन सपकाळ यांना आम्ही धडा शिकवू. काँग्रेसला त्यांच्या जिल्ह्यात अस्तित्व नाही, त्यांच्या जिल्ह्यात शून्य टक्के काँग्रेसचा निकाल आहे. पराभवाचे चटके रोज त्या ठिकाणी मिळत आहेत. त्यामुळे त्यांचा तिळपापड होत आहे. आणि ती भडास देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून काढत आहेत. आता आम्ही सहन करणार नाही, ज्या जिल्ह्यात ते असे वक्तव्य करतील, तेथे भाजप त्यांना सोडणार नाही, असे बावनकुळे म्हणाले. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version