विदर्भात मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र आणि बरेच व्याघ्र प्रकल्प आहेत. इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यातही ताडोबा व्याघ्र प्रकल्प देशविदेशातल्या पर्यटकांचं आवडतं पर्यटन स्थळ आहे. मात्र, कोरोनामुळे उन्हाळ्यापासूनच वन पर्यटन आणि जंगल सफारी बंद करण्यात आलं होतं. कोरोनाची लाट कमी झाल्यानंतर ऑक्टोबरपासून पर्यटनाला परवानगी मिळाली आहे. तेव्हापासून ताडोबात पर्यटकांची गर्दी वाढत आहे.
वन विभागाने ताडोब्यात ४ कँटर बस सुरु केल्या आहेत. इथे सफारीसाठी सकाळी आणि दुपारी एकूण १२५ गाड्या सोडण्यात येतात. ताडोब्यात लहान मोठे २५ रिसोर्ट आहेत. याची माहिती ताडोबा क्षेत्राचे संचालक जितेंद्र रामगावकर यांनी जय महाराष्ट्रला दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.