महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे. मंगळवारी ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई केली आहे. ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत विरोधकांवर आक्रमक झाले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा दावा, संजय राऊत यांनी राज्यसभेत केला आहे.
संजय राऊतांवर झालेल्या ईडी कारवाईनंतर राऊत आक्रमक झाल आहेत. संजय राऊतांनी राज्यसभेत केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच राऊत आक्रमकपणे भाजपवर हल्ला करत होते. मात्र, यावेळी त्यांना सभापतींनी बोलण्यापासून रोखून तुमची वेळ संपली असल्याचे सांगितले.
ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने संजय राऊत यांची अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील राहतं घर जप्त केले आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीने राऊतांवर कारवाई केली आहे. संजय राऊतांवर झालेल्या झालेल्या कारवाईमुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.