Flood Relief Fund : केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 6 हजार 418 कोटींचा आगाऊ हप्ता; पूरग्रस्तांना मदत मिळणार?

सणासुदीच्या काळात केंद्र सरकारकडून महाराष्ट्रालाा कराचा आगााऊ हप्ता देण्यात आला आहे. केंद्राने महाराष्ट्राच्या वाट्यापैकी 6 हजार 418 कोटी रुपये हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Flood Relief Fund : केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 6 हजार 418 कोटींचा आगाऊ हप्ता; पूरग्रस्तांना मदत मिळणार?

मुंबई: सणासुदीच्या काळात केंद्र सरकारकडून महाराष्ट्रालाा कराचा आगााऊ हप्ता देण्यात आला आहे. केंद्राने महाराष्ट्राच्या वाट्यापैकी 6 हजार 418 कोटी रुपये हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत. या निधीतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार का हे पाहावे लागणार आहे. 

केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला 6 हजार 418 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे हस्तांतरण 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामान्य मासिक हस्तांतरणाव्यतिरिक्त आहे. 

हेही वाचा: Dussehra Melava 2025: ज्यांना आयुष्यभर त्रास दिला त्या राज ठाकरेंना आता आय लव्ह यू म्हणताय…; गुलाबराव पाटील यांची ठाकरे सेनेवर टीका

सणासुदीच्या हंगामाच्या दृष्टीने आणि राज्याला भांडवली खर्च वाढवण्यास सक्षम करण्यासाठी तसेच आपल्या कल्याणकारी व विकास योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे.

मराठवाड्यात यंदा महापुराची स्थिती असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या प्रकारे निधी गोळा केला जात आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टीबाधितांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. शेतकऱ्याच्या ऊसामागे प्रति टन 15 रुपये कपात केली जाणार आहे. 15 रुपयांपैकी 5 रुपये बाधित शेतकऱ्यांना, तर उर्वरित 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जाणार आहेत. हा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version