देशातील ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध नसणार असल्याचे निर्देश केंद्र सरकारने काढले आहेत. कोणत्याही एका राज्यासाठी पुरवठा मर्यादित ठेवला जाऊ शकत नाही. तसेच ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
‘उत्तर प्रदेश आणि हरियाणा ऑक्सिजनचा पुरवठा अडवत आहेत, तर दुसरीकडे दिल्लीत ऑक्सिजनचा साठा झपाट्याने संपत आहे’, अशी तक्रार दिल्ली सरकारने केल्यानंतर ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोणत्याही अडवणूकविना वाहतुकीस परवानगी असेल, असे निर्देश केंद्र सरकारने काढले आहेत.
ऑक्सिजन पुरवठादार किंवा उत्पादकांवर राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेल्या रूग्णालयांनाच पुरवठा करण्यासाठी कोणतेही निर्बंध घातले जाणार नाहीत. मेडिकल ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारे अडवता येणार नाही. दिल्लीत ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून दिल्ली उच्च न्यायालयात गुरूवारी सुनावणी झाली. यावेळी सांगण्यात आले की,आता एक आदेश जारी करण्यात आला आहे की, कुठेही ऑक्सिजन वाहतुकीस रोखता येणार नाही.
संपादन- सिद्धी भरत पाटील
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.