‘कर्नाटका तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’

‘कर्नाटका तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’

कर्नाटकामध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेसकडून जल्लोष साजरा करण्यात आला. ठाण्यात राष्ट्रवादी पक्षाकडून मनःपूर्वक अभिनंदनाचे फलक लावण्यात आले आहेत. काँग्रेसच्या विजयाचा जितका जल्लोष केला जातोय किंबहुना त्यापेक्षा अधिक भाजपाच्या पराभवाचा आनंद बहुतेकांमध्ये जास्त दिसून येत आहे.

‘कर्नाटका तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’, हा विजय महागाई विरोधात, हा विजय हुकूमशाहीच्या विरोधात, हा विजय जनतेचा, हा विजय लोकशाहीचा अशा आशयाचे फलक राष्ट्रवादीकडून राजा राजपूरकर यांच्यावतीने लावण्यात आले आहेत. हे फलक सर्वांचे लक्ष वेधत आहे. येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत नक्कीच भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही असे देखील राज राजपूरकर यांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version