मनिष सिसोदियांची सीबीआय चौकशी

मनिष सिसोदियांची सीबीआय चौकशी

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने रविवारी चौकशीसाठी बोलावने केले आहे. दिल्ली मद्य उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाचा तपास सुरू असून यासंदर्भात सीबीआयकडून त्यांची चौकशी होऊ शकते. सिसोदिया यांनीच ट्विटद्वारे यासंबंधीची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांवर आरोपही केले आहेत. माझ्याविरोधात सीबीआय, ईडीची संपूर्ण शक्ती वापरली जात आहे. घरावर छापा टाकला, बँकेच्या लॉकरची झडती घेतली. मात्र, माझ्याविरुद्ध काहीही सापडले नाही. आतापर्यंत तपासात मी नेहमीच सहकार्य केले असून यापुढेही करत राहीन, असे सिसोदिया यांनी स्पष्ट केले आहे. मी दिल्लीतील मुलांसाठी चांगल्या शिक्षणाची व्यवस्था केली असून माझे हे कार्य रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही सिसोदिया यांनी केला आहे.

अबकारी धोरणात कथित घोटाळा झाल्याचा आरोप करत सिसोदिया यांची यापूर्वीही चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात ईडी देखील चौकशी करत आहे. परंतु, आतापर्यंत कुठल्याही आरोप पात्रात सिसोदिया यांचे नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. इडी अबकारी धोरणातील कथित घोटाळ्यात मनी लॉन्ड्रींग प्रकरणी सात कंपन्या विरोधात आरोपपत्र जानेवारी मध्ये दाखल झाले होते. ईडीने दाखल केलेल्या दुसऱ्या आरोप पात्रात देखील दिल्लीचे उपमुखमंत्री मनीष सिसोदिया यांचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही या प्रकरण दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात सिसोदिया यांचे नाव होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version