सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचं निधन

सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचं निधन

सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. दिल्लीत शुक्रवारी सकाळी रणजीत सिन्हा यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६८ वर्षांचे होते. गुरुवारी रात्री त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रणजीत सिन्हा बिहार कॅडरचे १९७४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. २०१२ ते २०१४ दरम्यान ते सीबीआयच्या संचालकपदी होते.

सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती होण्याआधी रणजीत सिन्हा यांनी रेल्वे सुरक्षा दलाचे नेतृत्व केले होते. याशिवाय रणजीत सिन्हा हे दिल्ली आणि पाटणामध्ये सीबीआयच्या वरिष्ठ पदावरही होते. सीबीआयचे प्रमुख असताना रणजीत सिन्हा अनेक वादांमध्ये अडकले होते. इशरत जहाँ चकमक प्रकरणावरुन त्यांचा गुप्तचर विभागाशी वाददेखील झाला होता.

२०१४ मध्ये त्यांच्या पत्नीने पाटणामधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते. कोळसा खाण घोटाळ्याच्या तपासात मध्यस्थी करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. २ जी घोटाळ्यातील आरोपी किंवा कंपन्यांचे प्रतिनिधी अनेकदा त्यांच्या निवासस्थानी गेल्याचं समोर आलं होतं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version