मुंबई, १९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या विरोधातील कोणताही खटला मागे घेतलेला नाही, असे भारतीय जनता पार्टीचे मोहित कंबोज भारतीय म्हणाले. मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने तब्येतीच्या कारणास्तव दोन महिन्यांचा जामीन दिला आहे. यानंतर अचानक मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या विरोधातील खटला मागे घेतल्याचे वृत्त आले. पण या वृत्तात तथ्य नसल्याचे मोहित कंबोज यांनी सांगितले.
खोट्या बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. नवाब मलिक यांच्या विरोधातील कोणताही खटला मागे घेतलेला नाही. न्यायालयात तारखा पडत आहेत. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, असे मोहित कंबोज यांनी सांगितले.
याआधी सलीम जावेद जेल जायेंगे अशी सांकेतिक ट्वीट मोहित कंबोज यांनी केले होते. यानंतर काही दिवसांतच उद्धव ठाकरे समर्थक राज्यसभा खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी पुढील काही महिन्यांतच तुरुंगात जावे लागले. आता नवाब मलिक यांच्या विरोधातील कोणताही खटला मागे घेतलेला नाही, असे मोहित कंबोज भारतीय यांनी ठामपणे सांगितले आहे. यामुळे नवाब मलिक प्रकरणात पुढे काय होणार यावरून चर्चेला उधाण आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.