संदल यात्रेतील १ हजार जणांवर दाखल गुन्हा होणार

संदल यात्रेतील १ हजार जणांवर दाखल गुन्हा होणार

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सैलानी येथे दरवर्षी होळीनिमित्त १० दिवसीय यात्रा असते. या यात्रेचा समारोप संदल काढून करण्यात येत असतो. मात्र मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सैलानी बाबाची ही यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. असे असताना देखील सैलानी बाबाचा संदल काढण्यात आला. यामध्ये कोरोना नियमांची पायमल्ली करत मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली. यामध्ये जिल्हा प्रशासनाचे कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले असल्याचं पाहायला मिळालं.

शासकीय आदेश आणि कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आता संदल काढणाऱ्या एक हजार लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार रुपेश खंडारे यांच्याकडून देण्यात आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथे दरवर्षी सैलानी बाबाचा १० दिवसीय उत्सव साजरा करण्यात येत असतो.. मात्र कोरोनामुळे या भागात १४४ कलमानुसार जमावबंदीचे आदेश असताना देखील शुक्रवारी सायंकाळी संदल काढण्यात आला. या प्रकरणी आता एक हजार लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version