Budget 2020 : शेतकऱ्यांचा माल लोकलच्या एसी डब्यातून

Budget 2020 : शेतकऱ्यांचा माल लोकलच्या एसी डब्यातून

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21 या वर्षाचं बजेट लोकसभेत सादर केलं. या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजनांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा होईल या उद्देशाने योजना मांडल्या आहेत. कृषी आणि सिंचन क्षेत्रासाठी 2.83 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचा माल ने आण करण्यासाठी आता ‘एसी डब्याची सोय‘ करण्यात येणार आहे. ज्यातून फळे, भाज्या घेऊन जाता येतील. जेणेकरून शेतकऱ्याचा माल ने आण करताना खराब होणार नाही. माल जास्त काळ टिकून राहील. बाजारात मालाला जास्त भाव मिळेल. त्यामुळे शेतकऱ्याला नफा होईल.

त्याचप्रमाणे सरकार 20 लाख शेतकऱ्यांना सोलार पंप बसवून देण्यात मदत करणार आहे.

16 सूत्री कार्यक्रमात सेंद्रीय खतांवर भर, सौर पंप, शेतीवर गुंतवणूक या मुद्द्यांचा समावेश असणार आहे.

कृषी क्षेत्राच्या मार्केटिंग प्रोसेस वर भर दिला जाणार आहे.

2025 पर्यंत दूध उत्पादन दुप्पट केलं जाणार असून मासेमारी उत्पादन 200 टन पर्यंत वाढवण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version