सांगलीच्या शिराळा तालुक्यातील कुसळेवाडी येथील पुलाचा धर गेल्या अनेक दिवसांपासून हळूहळू कोसळत चालला होता.हा पुल कोसळल्याने पुला पलिकडील मस्कर गल्लीचा आणि शेतकऱ्यांचा संपर्क तुटला आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाले नाही. हा पूल ज्यावेळी कोसळला, त्यावेळी तिथं कपडे धुण्यासाठी आलेल्या महिला एकदम भयभीत झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. पूर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे. पुल कोसळल्याने येथील शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आता शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पणुंब्रे वारूण गावच्या पुलावरून वाहतूक तसेच कालव्याला कायम पाणी राहील्यास ये- जा ही याचं मार्गांवरून करावी लागणार आहे. याबाबत संबंधित विभागाने लक्ष देऊन नवीन पुलाची उभारणी करून येथील शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी मागणी होत आहे.
याबाबत कुसळेवाडीचे सरपंच श्रीकृष्ण कुसळे यांनी पुढाकार घेऊन संबंधित विभागाला वेळोवेळी पुलासंदर्भात कागदोपत्री निवेदन दिले होते. वारंवार अधिकाऱ्यांना विनवणी करुन सुध्दा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पुल कोसळला असल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. ज्यावेळी पूल कोसळला त्यावेळी शेतकऱ्यांची अथवा कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरु नव्हती. त्यामुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहाणी झाली नाही. शिराळा पश्चिम भागात कुसळेवाडी हे साधारण एक हजार लोक संख्येचे गाव आहे. गावाला लागून वारणा डावा कालवा गेला आहे. गावची नव्वद टक्के शेती पुलाच्या पलीकडे असल्याचं शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे कालव्यावरील पुलावरून सतत शेतकऱ्यांची रहदारी सुरू होती. पुलाच्या पलिकडे दहा कुटुंब वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून पुलाची दुरवस्था झाली होती. पुलावर लावण्यात आलेले पोल सुध्दा गायब झाले आहेत. पुलाच्या मधील दगडी भिंतीची दगडे हळूहळू ठासळू लागली होती. तर एका बाजूने पुलाचा भराव ही ठासळू लागला होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.