कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहे. देशात कोरोना संसर्गाच्या नव्याने वाढ होत असताना सरकारने १८ ते ५९ वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जुलैपासून ७५ दिवस कोरोना लसीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे.देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारतात केंद्र सरकारतर्फे अमृत महोत्सवी वर्ष साजरं केले जात आहे. या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचाच एक भाग म्हणून देशभरात ही मोहीम राबवली जाणार आहे.मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस मोफत दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचाच एक भाग म्हणून देशभरात ही मोहीम राबवली जाणार आहे.
ज्यांनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्यांच्यासाठी बूस्टर डोस मोफत देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला.कोरोना विरोधी लसीकरणाचे दोन डोस घेतल्यानंतर बुस्टर डोस अधिक प्रभावी ठरत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. पण त्याबदल्यात बुस्टर डोस घेण्याचे प्रमाण काही वाढताना दिसत नाही. बुस्टर डोस घेण्याची जनजागृती आणि प्रमाण वाढण्यासाठी केंद्राने महत्वाचा निर्णय घेत देशातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नवे गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आगळेवेगळे सेलिब्रेशन म्हणून १५ जुलैनंतर पुढचे ७५ दिवस देशातील १८ वर्षांवरील नागरिकांना सरकारी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस मोफत उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.