बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ आणि विकी कौशल हे सध्या त्यांच्या वयक्तिक आयुष्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत. काही महिन्यांपूर्वी विकी आणि कतरिना यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आई वडील होणार असल्याची माहिती शेअर केली होती. अशातच आता त्याबद्दलची एक मोठी अपडेट समोर आली आहे. विकी आणि कतरिना यांच्या घरी तान्हुल्याचे आगमन झाले आहे.
विकीने त्यांच्या सोशल मीडिया वर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “आम्ही प्रेम, कृतज्ञतेनं आमच्या बाळाचं स्वागत करतो”. असं म्हणत दोघांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ब्लेस्ड विथ बेबी बॉय असे लिहिले आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.