भोपाळमध्ये गणपती विसर्जनावेळी नाव उलटून 11 जणांचा मृत्यू

भोपाळमध्ये गणपती विसर्जनावेळी नाव उलटून 11 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशात गणपती विसर्जनादरम्यान एक मोठा अपघात झाला. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गणपती विसर्जनावेळी एक नाव उलटली . नाव उलटल्याने 18 लोक तलावात बुडाले. या अपघातात 11 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . तर एकजण अद्यापही बेपत्ता आहे.

नेमकं काय घडलं?

या अपघातात आतापर्यंत सहा जणांना वाचवण्यात आलं आहे. भोपाळ येथील तलावात नाव उलटल्याने हा अपघात झाला. खाटलापुरा घाट जवळ पहाटे साडे चारच्या सुमारास ही अप्रिय घटना घडली. NDRF, SDRF आणि होमगॉर्ड्सच्या टीमने आतापर्यंत 11 मृतदेहांना पाण्यातून बाहेर काढलं आहे.

यामध्ये लहान मुलं आणि तरुणांचा समावेश आहे. तर आणखी काहीजण या अपघातात दगावल्याची भिची आहे. बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे, अशी माहिती रेस्क्यू ऑपरेशनमधील एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. खाटलापुरा घाटाजवळील तलावात ज्या नावेत गणपतीला विसर्जनासाठी नेण्यात येत होतं, ती नाव लहान होती आणि त्या तुलनेत मूर्ती मोठी झाली.

यावेळी मूर्ती विसर्जनासाठी पाण्यात उतरवताना नाव एका बाजुने झुकली आणि पाहता पाहता पलटली. यादरम्यान नावेत असलेले भाविक मूर्तीच्या खाली आले आणि बुडाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version