मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने पहिला डाव टाकला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निष्ठावंत शिलेदाराने पक्षाला उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जय महाराष्ट्र केला. तिकीट वाटपातील नाराजीने या निष्ठावंताने शिंदे सेनेला रामराम केला. काँग्रेसने या शिलेदाराच्या पत्नीला तिकीट दिले आहे.
शिवसेना विभाग क्रमांक २ चे विभागप्रमुख लाल सिंह राजपुरोहित यांनी शिवसेनेतून राजीनामा दिला आहे. शिवसेना विभागप्रमुख लालसिंग राजपुरोहित यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केलाआहे. लालसिंग राजपुरोहित यांनी त्यांची पत्नी भाग्यलक्ष्मी यांना वॉर्ड क्रमांक ३१ मधून काँग्रेसची उमेदवारी दिली.
लालसिंग राजपुरोहित हे शिवसेनेचे विभागप्रमुख होते पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे या प्रभागात आता समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
.पालिका निवडणुकीत शिवसेना ९० जागांवर लढत असून शेवटच्या जागेपर्यंत भाजपसोबत वाटाघाटीत रस्सीखेच सुरू होती. बंडखोरी टाळणयासाठी शिंदेंकडून पूर्णतहा खबरदारी घेत रात्री उशिरा शिंदेंनी कुठलिही यादी न काढता,थेट इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटण्यास सुरूवात केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.