शिरपुर शहराजवळ केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोट, 8 जणांचा मृत्यू

शिरपुर शहराजवळ केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोट, 8 जणांचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या वाघाडी गावाजवळ असलेली बिजासनी केमिकल फॅक्टरीत आज सकाळच्या सुमारास मोठा स्फोट झाला. वाघाडी केमिकल फॅक्टरीत झालेल्या बॉयरलच्या स्फोटात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोटात 40 ते 50 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे जखमींना जवळच्या शिरपूर आणि धुळे ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे

फॅक्टरीत झालेल्या भीषण स्फोटामुळं जवळपास 2 किलोमीटरपर्यंतची जमीन हादरली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह वैद्यकीय अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. हा स्फोट कशामुळे झाला आणि नेमकं काय झालं याचा तपास केला जात आहे.

या स्फोटात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी काही लोक अडकल्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे.

बचावकार्य सुरु

-घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या आहेत.

-अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे काही प्रमाणात आग आटोक्यात

-या स्फोटात 14 जणांचा मृत्यू आकडा वाढण्याची शक्यता आहे.

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

या स्फोटामुळे -आसपासचा परिसरही हादरला असून नागरिकांमध्येही भितीचं वातावरण पसरलं आहे.
-अद्यापही आग धुमसत असून परिसरात आगीचे लोट पसरले आहेत.

दरम्यान, हा स्फोट कशामुळे लागला याची माहिती अद्याप समोर आली नाही.
या कंपनीचं नाव Maa Bijasani Life Sciences Pvt.Ltd. असं होतं.

मात्र 01.08.2018 ला
Rumit Chemisynth Pvt.Ltd. on
New company is Bombay based. असं झालंय.

-अनेक वेगवेगळ्या अफवा पसरल्यामुळे  पोलिस स्टेशनशीच थेट संपर्क करावा असं प्रशासनाने आवाहन केलंय.

-आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला.

-आतापर्यंत पालकमंत्री,खासदर,स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांच्यासह महत्वाचे अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

-शिरपूर ते शहादा खबरदारी उपयोग म्हणून रस्ता काहीकाळ करण्यात बंद आलं

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version