मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपा सावरकर मुद्दा पुन्हा समोर आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाणार आहे. सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा भाजपाकडून प्रचारात आणला जाण्याची शक्यता आहे. विरोधकांचा संविधानाचा मुद्दा निष्प्रभ करण्यासाठी सावरकरांच्या कथित अपमानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला जाणार असल्याच्या चर्चा आहेत. हा झंझावात अडवायचा असेल तर त्यांना सावरकरांच्या मुद्द्यावरून घेरले जाऊ शकते. सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली तर महाविकास आघाडीतील शिउबाठाचीही पंचाईत होऊ शकते. हा विचार करून भाजपमध्ये केंद्रीय स्तरावर रणनीती आखली जात असल्याचे समजते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.