भाजपाच्या पोलखोल अभियान रथाची अज्ञातांकडून तोडफोड

भाजपाच्या पोलखोल अभियान रथाची अज्ञातांकडून तोडफोड

महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई पालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी भाजपाच्यावतीने पोलखोल अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. चेंबूर कॅम्पयेथील भाजपा कार्यालयात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत या रथ यात्रेची सुरूवात होणार होती. मात्र, रथयात्रेच्या आधल्या रात्री रथाची तोडफोड करत नुकसान केले आहे.

मविआ सरकारमधील विविध आर्थिक गैरव्यवहाराबाबत भाजपकडून पोलखोल अभियान रथ यात्रेची सुरूवात होणार होती. परंतु भाजपाच्या पोलखोल अभियान रथाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. रथाची तोडफोड केल्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले असून याप्रकरणी पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर या ठिकाणी भाजपचे सर्व नेते एकवटतील आणि जनतेच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला आहे.

तसेच, भाजपच्या पोलखोल रथाची अज्ञातांकडून तोडफोड केल्याप्रकरणी प्रविण दरेकर म्हणाले, पोलखोल रथ यात्रेला नागरिकांकून प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अज्ञातांकडून रथाची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे तोडफोड करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली नाही तर पोलीस ठाण्यात येऊन ठिय्या आंदोलन करू, अशा इशारा दरेकरांनी दिला आहे. दंडेशाहीला दंडेशाहीनेच उत्तर द्यायची वेळ आणू नये. हा शिवसेनेचा डाव आहे, भ्रष्टाचार उघडकीस होईल याची शिवसेनेला भीती आहे, असा टोलाही प्रवीण दरेकरांनी लगावला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version