Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेसाठी भाजपची खलबतं! वाट्याला 6 जागा, इच्छूकांची फिल्डिंग; या 12 नावांची जोरदार चर्चा, उमेदवारी कोणाला मिळणार?

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेसाठी भाजपची खलबतं! वाट्याला 6 जागा, इच्छूकांची फिल्डिंग; या 12 नावांची जोरदार चर्चा, उमेदवारी कोणाला मिळणार?

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची खलबतं सुरू झाली आहेत. भाजपच्या कोअर कमिटीची आज रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीच्या नावांची चर्चा या बैठकीत पार होणार असल्याचे समजते. परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आजच्या बैठकीतील चर्चेनंतर भाजपकडून काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाला पाठवला जाण्याची शक्यता आहे. विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 10 पैकी 6 जागा मिळणार आहेत. या सहा जागांसाठीच्या नावांची चर्चा बैठकीत होईल. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. तर इतर 5 नावांवर चर्चा होत असताना जातीय आणि प्रादेशिक समतोलाचा देखील विचार होणार असल्याची माहिती मिळत आहे. विधान परिषदेसाठी इच्छुकांकडून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी यांच्या नावांची चर्चा आहे.

हेही वाचा : Devendra Fadnavis : ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल मला फोन करून…’ बारामतीत फडणवीसांचा मोठा खुलासा; सुनेत्रा वहिनींना दिला भक्कम पाठिंबा

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version