Sandeep Deshpande : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गटाची युती; संदिप देशपांडेंनी केला मोठा खुलासा म्हणाले, "अंधारात ठेवलं की त्यांनी स्वतःहून…"

चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट व भाजप एकत्र आले. याचपार्श्वभूमिवर मनसे नेते संदिप देशपांडे यांनी मोठा खुलासा केला आहे.
Sandeep Deshpande : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गटाची युती; संदिप देशपांडेंनी केला मोठा खुलासा म्हणाले, "अंधारात ठेवलं की त्यांनी स्वतःहून…"

चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीने राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार केले आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट व भाजप एकत्र आले. या नव्या समीकरणामुळे चंद्रपूरमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  याचपार्श्वभूमिवर मनसे नेते संदिप देशपांडे यांनी मोठा खुलासा केला आहे. चंद्रपूरात उबाठाच्या नगरसेवकांना एक एक कोटी घेतल्याची माहिती मनसेला मिळाली असल्याचा दावा मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केला. तसेच यावर प्रतिक्रिया देत ते म्हणाले की, “संजय राऊत यांची वागणूक अशी बरी नाही… ‘हम करे तो रास लीला तुम करो तो कॅरेक्टर ढिला’, मला जी माहिती सूत्रांनी दिली ती 1 कोटी रुपये प्रत्येक नगरसेवकांना दिले आणि अपक्षांना 50 लाख… चंद्रपूरच्या बाबतीत संजय राऊत यांना अंधारात ठेवलं की त्यांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली हे बघावं लागेल…”  असं संदिप देशपांडे म्हणाले आहेत. 

हेही वाचा- Amol Mitkari On Ajit Pawar Death : मुख्यमंत्री शांत बसणार नाहीत, त्यांच्या जवळच्या मित्राच्या घातपाती मृत्यूमागील षडयंत्राचा छडा लावतीलच
पुढे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे हे नरेंद्र मोदी यांना जास्तच घाबरतात असं मोठं वक्तव्य केलं होतं. राज ठाकरे यांनी संघाच्या कार्यक्रमात सेलिब्रिटीवरून निशाणा साधला होता. यावर नाशिकमधून बोलताना कोश्यारी यांनी राज ठाकरेंविरोधात मोठा दावा केला होता. यावर आता मनसे नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया केल्या आहेत. मनसे नेते संदिप देशपांडे यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. ” आज जर भगतसिंग असते तर त्या कोश्यारींना खूप चोपला असता… भागासिंग यांचं नाव या माणसाला देणे म्हणजे अपमान आहे… त्यामुळे भागसिंग यांनी त्यांचं नाव बदलाव अशी आमची मागणी…” कोश्यारी यांनी पहिलं नाव बदलावं असा सल्लाही संदिप देशपांडे यांनी कोश्यारी यांना दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version