BJP Nagar Parishad Election Result 2025 : विजयाचं गमक नेमकं आहे तरी काय?, ‘या’ कारणांमुळे राज्यात मतदारांचा भाजपला पाठिंबा

महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. तर 24 ठिकाणी स्थानिक आघाडीचे नगराध्यक्ष निवडून आले
BJP Nagar Parishad Election Result 2025 :  विजयाचं गमक नेमकं आहे तरी काय?, ‘या’ कारणांमुळे राज्यात मतदारांचा भाजपला पाठिंबा

राज्यात  नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे, तर महाविकास आघाडीला पुन्हा एकदा पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. राज्यात महायुतीचे तब्बल 215 नगराध्यक्ष निवडून आले आहेत, तर महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. तर 24 ठिकाणी स्थानिक आघाडीचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देखील भाजपनं मोठं यश मिळवलं आहे, भाजप निवडणुकीत नेहमीच विजयी का होतो? नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा पाच कारणं समोर आले आहेत, कोणती आहेत ती कारण जाणून घेऊयात.

युतीचा निर्णय – भाजपने या निवडणुकीत काही ठिकाणी महायुतीमधील पक्षांसोबत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती केली. भाजपच्या या लवकचिक धोरणामुळे त्यांना मोठं यश मिळालं.

लाडकी बहीण योजना – लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा याही निवडणुकीत जादू चालल्यांच पहायला मिळालं आहे.  महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं आहे. लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा हा भाजपला आणि महायुतीला झाला आहे.

फडणवीसांची कमाल – या निवडणुकीत विजयाचं आणखी एक मोठं कारण म्हणजे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे या निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरले होते. त्याचा फायदा युतीला निवडणुकांमध्ये झाला. 

प्रचारावर अधिक लक्ष – निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची भाजपच्या प्रचाराचं नियोजन हे नेहमीच काटेकोर आणि शिस्तबद्ध राहिलं आहे. भाजप नेहमीच बुथ पातळीवर नियोजन करते, त्याचा फायदा त्यांना प्रत्येक निवडणुकीत होतो.

 मेरिट लिस्टवर उमेदवारी – भाजपकडून उमेदवारांना मेरिट लिस्टवरच उमेदवारी देण्यात आली त्याचाही मोठा फायदा झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version