Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपची रात्री उशिरापर्यंत खलबतं; महायुतीत रस्सीखेच

Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपची रात्री उशिरापर्यंत खलबतं; महायुतीत रस्सीखेच

मुंबई : राज्यात सध्या विधानपरिषदेच्या जागावाटपावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत आहेत. महायुती ही निवडणूक एकत्रित लढत असून यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जागावाटपाचा तिढा सुटला असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अद्याप कोणत्याही पक्षनेत्याकडून याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच याबाबत घोषणा करणार असल्याचे जाही केले आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपची काल, सोमवारी सायंकाळी महत्त्वाची बैठक घेतली असून ही बैठक वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व मंत्री चंद्रशेखर बावनकुळेदेखील उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानपरिषद निवडणुकीतील जागावाटपाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली असून एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या चर्चेचा तपशील चव्हाण आणि बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जागांवरील तिढा सोडवण्यावर या बैठकीत भर देण्यात आले. 

हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरात खळबळ! शिवसेना उपजिल्हाप्रमुखांवर जीवघेणा हल्ला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 जून असून 2 जून रोजी अर्जांची छाननी केली जाईल. तर अर्ज माघारीची मुदत 4 जूनपर्यंत असणार आहे. महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल होत भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1 असा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version