महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडून मार्चमध्ये राज्यात भाजपचे सरकार येईल असा दावा, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मार्चमध्ये राज्यात भाजपचे सरकार असल्याची भविष्यवाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारकडून राणे यांच्या वक्तव्याचा विरोध केला आहे.
नारायण राणे म्हणाले की, महाराष्ट्रात लवकरात लवकर भाजपचे सरकार सत्तेत येईल. जो बदल तुम्हाला अपेक्षित आहे तो मार्च महिन्यापर्यंत दिसून येतील, असे ते म्हणाले. तसेच सरकार पाडायचे असेल किंवा सरकार स्थापन करायचे असेल तर काही गोष्टी या गुप्त ठेवाव्याच लागतात असे विधान नारायण राणे यांनी नमूद केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.