मुंबईमध्ये भाजपचा स्थापना दिवस साजरा

मुंबईमध्ये भाजपचा स्थापना दिवस साजरा

गुरुवारी भाजपचा ४४वा स्थापना दिन देशभरात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने देशात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्थापना दिवसाचे औचित्य साधून राज्यात देखील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. याच निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामुळे भारताला जगातील पाचवी अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळाला आहे. भविष्यातील आशेचा किरण जर कोणता देश असेल तर तो भारत असेल. आपण सत्तेकरीता जन्माला आलेलो नाही, सत्ता आपल्याकरिता केवळ एक साधन आहे. ज्याचा उपयोग करून आपल्याला सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणायचे आहे. या दोन्ही गोष्टींच्या लढाईसाठी एक साधन म्हणून आपण सत्तेकडे पाहतो.’

पुढे फडणवीस म्हणाले,’भाजप देशाच्या सगळ्या भागामध्ये जनतेचा पक्ष म्हणून आपल्याला बघायला मिळत आहे. समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा मोदींवर विश्वास आहे. कारण एक नेता स्वतःचा विचार न करता घर, संसार आणि कुटुंबाचा त्याग करून २४ तास भारताचा विचार करत असल्याने त्यांच्याबाबत हा विश्वास निर्माण झाला आहे. कोविड काळात मोदी यांच्यामुळे भारतातील एकही व्यक्ती उपाशी राहिला नाही. कोरोना काळात लोकांना मोफत व्हॅक्सिन देण्याचे काम मोदी यांनी केले’ असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version